योगाचे फायदे मानसिक ,अध्यात्मिक आणि शारिरीक आरोग्यासाठी रामबाण उपाय

योगाचे फायदे : तन मन आणि आत्मिक शांतता

योगाचे फायदे : आजच्या धावपळीच्या जीवनात आपण फक्त पैशाच्या मागे धावत असतो असे समजून की,पैसे मिळाले की आपण सुखी होऊ पण पैसे मिळाले तरी सुख काही मिळत नाही.पैसे कमावण्याच्या आधी आपण आपले शारीरिक सांभाळले आणि कमावले पाहिजे. मानसिक स्थिर करण्याआधी आपलं शरीर चांगल निरोगी पाहिजे.
पैसे खूप कमावले पण आपले शरीर रोगी असेल तर तेच पैसे शरीरासाठी खर्च होऊन जातील पण आनंद मिळणार नाही ,म्हणून आता टेक्नॉलॉजी च्या काळात आपली शारिरीक हालचाल कमी होतं चालली आहे आणि हेच आपल्या आजारी आणि दुःखच कारण आहे म्हणून योगाचे फायदे जाणून घ्या आपल्या साठी योगा किती महत्त्वाचे आहे.

योगाचे फायदे

योगाचे शारिरीक फायदे

नियमित योगा केल्यामुळे स्नायूंची लवचिकता वाढते त्यामुळे सांधे दुःखी कमी होऊन आराम मिळतो. वारा भरण्याचे प्रकार शरीरातून कमी होतात.आणि स्नायू आणि संध्यातील शक्ती वाढून शरीर निरोगी होण्यास मदत मिळते.

समजूतदारपणा येऊन सहनशक्ती वाढते

योगाच्या विविध आसन केल्यामुळे शरीरातील energy increase होते आणि कामातील उत्साह वाढतो त्यामुळे सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारी चिडचिड कमी होऊन सहनशक्ती वाढते.

वजन कमी होण्यास फायदा

नियमित योगा केल्यामुळे चयापचय क्रियेत सुधारणा होते त्यामुळे वजन योग्य राहते.आणि वजन कमी होण्यास मदत मिळते.

श्वासोच्छवास क्रियेत फायदा

योगासनातील प्राणायाम आसनामुळे श्वसन संस्था मजबूत होते आणि फुफुस जास्त काळ कार्यक्षम राहते.

योगाचे रक्तभिरणाचे फायदे

योगसनामुळे हृदयाचे आरोग्य सुधारून रक्तभिसरण क्रिया सुरळीत होण्यास मदत होते.

योगाचे मानसिक फायदे

तणाव कमी होतो ( depression ) कोणत्याही कामात अपयश आल्यानंतर जे नकारात्मक विचार मनाकडे येतात त्याने खूप त्रास होतो माणूस हृदयविकाराचा बळी होतो.म्हणून मानसिक तणावापासून दूर व्हायचं असेल तर योगा हा सोपा मार्ग आहे.योगा आणि प्राणायाम मुळे मन एकाग्र होते मनाकडे प्रसन्नता येते आणि मन शांती मिळते.

योगाचे फायदे

एकाग्रता वाढते (Concentration)

कोणत्याही कामात यशस्वी व्हायचे असेल तर त्या कामात एकाग्रता असलाच हवी तर तुम्ही यशस्वी होऊ शकता आणि ही एकाग्रता योगामुळे मिळते आणि कामातील क्षमता वाढून न थकता काम करू शकता.

आत्मविश्वास ( confidence)

आत्मविश्वास शिवाय तुम्हाला कुठे खूप लोकांमधे बोलता ही येणार नाही पण नियमित योगा करत असाल तर तुमच्या आरोग्यात सुधारणा होऊन तुमच्यातील आत्मविश्वास वाढलेला दिसून येईल.

नकारात्मकता ( nigetivity)

योगासनांचे मानसिक फायद्यामधे हा फायदा खूप महत्वाचा मिळतो ते म्हणजे तुमच्या मधील नकारात्मक विचार नाहीसे होऊन ,सकारात्मक विचार वाढण्यास सुरुवात होते.

योगाचे अध्यात्मिक फायदे ( spirituality)

नियमित योगासनामुळे तुम्हाला तुमची खरी ओळख होते अहम ब्रम्हास्मी ह्याचा अनुभव होतो.आणि मन शांती मिळते.या शांतीच्या माध्यमातून तुम्ही आत्मज्ञान प्राप्त करू शकता आणि आत्म्याची खरी ओळख मिळवू शकता.

आनंद मिळतो ( happiness)

जीवनाचा खरा अर्थ आणि आनंद तुम्ही योगा मधून मिळवू शकता .योगामुळे मन आतून तृप्त होते त्यामुळे कोणत्याही परीस्थितीत तुम्ही समाधानी राहू शकता.

चिंतन प्राप्त होते

जीवनातील सगळ्यात महत्वाच्या गोष्टी करू शकतो ,नाहीतर माणसाचा आयुष्य हे जे निरुपयोगी आहे त्याच्या मागेच जातो.त्याला महत्वाचे काय हेच कळत नाही आणि आयुष्य निघून जात पण तुम्ही नेहमी योगा करत असाल तर तुम्ही चिंतनशील होता आणि महत्वाचे कामाला सगळ्यात जास्त महत्व देता.

नियमितपणा ( consistency)

वरील सर्व फायदे मिळवायचे असतील तर दे एक किंवा दोन दिवसात शक्य नाही म्हणून योगाचे नियमित अभ्यास महत्त्वाचा आहे .सुरुवातील आपण सोप्या आसनाने सुरुवात करायला पाहिजे नंतर हळूहळू थोडे कठीण योगा साठी प्रयत्न करायला पाहिजे आणि हे सर्व प्रकार हे प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनातून केल्यास योगाचे फायदे मिळवू शकतो.

योगा ( yoga)

योगा हे प्रकार प्राचीन आहे आपल्या शास्त्र आणि पुराणातही योगाचा उल्लेख मिळतो ,साधू,मुनी तपस्वी हे ब्रम्ह प्राप्ती साठी योगाचा अभ्यास करत असत.आणि ह्याच अभ्यासामुळे आपण आपले मन,तन आणि अध्यात्म समृध्द करू शकतो .म्हणून सगळ्यांवर एक रामबाण उपाय म्हणजे योगा समजला जातो.
तुम्ही आज पासून सुरुवात करू शकता.


हे ही सविस्तर वाचा – 

chatrapati shivaji maharaj quotes in marathi 

Motivational quotes in marathi