Lakudtodyachi Goshth मराठीत लांडगा आला रे आला Marathi Story: आपलं लहान पण हे छान छान गोष्टी ऐकत वाढलेलं असतं.लहानपणी आपल्यावर संस्कार करताना आपल्या पालकांनी आपल्याला काही बोध कथा सांगितल्या होत्या त्या कथा अजूनही कल्पनेत आहेत.अशाच काही कथा आज तुम्ही वाचा.
लांडगा आला रे आला.
एक मेंढपाळ होता त्याला एक खोडकर मुलगा होता.त्याला रोज मेंढ्यांना चारून आणण्याचे काम त्याच्या वडिलांनी दिले होते.पण मेंढ्या चरे पर्यंत त्याला कंटाळा येत असे म्हणून त्यांनी हाच कंटाळा घालवण्यासाठी एक मजेशीर कल्पना केली.
मेंढ्या चारत असताना तो अचानक झाडावर बसून जोरजोरात आरडाओरडा करू लागला ,लांडगा आला रे आला, पळा पळा, वाचवा,लांडगा माझ्या मेंढ्यांना खाईल,लांडगा आला रे आला….हे ऐकून शेतात काम करणारी माणसं हातातली सगळी कामं टाकून त्याच्या मदतीला धावून आले,तेव्हा तो झाडावर बसून हसू लागला,आणि म्हणाला कसं उल्लू बनवलं sss हा!!!हा!!!!हा!!! माणसं वैतागून निघून गेली.
दुसऱ्या दिवशीही त्या मुलाने हेच केलं तो पुन्हा जोरजोरात ओरडू लागला .माणसांना वाटलं आज तरी खरं असेल म्हणून धावत त्याच्या मदतीला धावून आली,पुन्हा तो मुलगा हसू लागला पुन्हा,लोकं रागाने वैतागून निघून गेली.
आणि काही दिवसांनी एकदा खरचं लांडगा आला आणि त्याच्या मेंढ्या वर हल्ला केला तो मुलगा घाबरून पुन्हा ओरडू लागला ,पण आता लोकांचा त्याच्यावर विश्र्वास राहिला नव्हता..कोणीही त्याच्या मदतीला आलं नाही, मुलाच्या खोडकरपणामुळे मेंढ्यांना जीव गेला .
बोध – नेहमी खरे बोलावे.
लाकूडतोडया
एका गावात एक प्रामाणिक गरीब लाकूड तोडया होता.तो जंगलातून लाकड तोडून विकून आपला उदरनिर्वाह करत असे.. नेहमीप्रमाणे तो जंगलं मधे एका नदीकिनारी लाकूड तोडत होता तेव्हा अचानक त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली.दुसरी कुऱ्हाड घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते.
म्हणून तो ढसढसा रडू लागला तेव्हा त्याचे रडणे ऐकून नदीतील देवी प्रगट झाली आणि म्हणाली ,काय झालं असं का रडतोस ,तेव्हा त्या लाकूडतोड्याने सगळं सांगितलं,तेव्हा देवी पुन्हा नदीत गेली आणि सोन्याची कुऱ्हाड आणली आणि म्हणाली ही आहे का तुझी कुऱ्हाड तेव्हा लाकूडतोड्या म्हणाला नाही…ही माझी कुऱ्हाड नाही…मला माझी कुऱ्हाड हवी आहे .तेव्हा देवी पुन्हा नदीत गेली आणि चांदीची कुऱ्हाड आणली आणि म्हणाली ही घे तुझी कुऱ्हाड तेव्हा लाकूडतोड्या पुन्हा म्हणाला ही माझी कुऱ्हाड नाही….मला माझी कुऱ्हाड पाहिजे.तेव्हा देवी नदी जाऊन लोखंडाची कुऱ्हाड घेऊन आली आणि म्हणाली ही घे तुझी कुऱ्हाड तेव्हा लाकूडतोड्या म्हणाला हीच आहे माझी कुऱ्हाड आणि तो आनंदी झाला…देवीचे आभार मानले.तेव्हा देवी प्रसन्न होऊन त्याचा प्रामाणिकपणा पाहून त्या लाकूडतोड्या दोन्ही कुऱ्हाड बक्षिस म्हणून दिल्या.आणि त्या लाकूडतोड्या चे आयुष्य बदलून गेले.
बोध – म्हणून प्रामाणिकपणाचा मोबदला देव देतोच.
हे ही वाचा – मैत्री असावी तर अशी